लिहायला कुणाला आवडत नाही? प्रत्येकाला वाटत असत आपण एखादी तरी कविता कथा लिहावी ती सगळ्यांनी वाचावी त्याची स्तुती करावी. बरेच जण तस लिहायचा प्रयत्न देखील करतात. पण काही तरी राहूनच जात मनात शब्द तर असतात पण ते कागदावर कसे मांडायचे तेच समजत नाही.
चला तर मग आज पहिले एका छोट्याशा कथेन समजून घेऊत
एक जादुई झाड
एक विराजपूर नावाच छोटस गाव होत. तीथे लीसा नावाची एक लहान गोड मुलगी रहात होती.
लीसा एक हुशार जिज्ञासू आणि साहसी मुलगी होती. तीला कायम नव नवीन गोष्टी जाणून घ्यायला आवडत असे. त्यामुळे ती सगळ्यांची लाडकी ही होती.
एक दिवस असच ती आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर जंगलात फिरायला गेली असता. तीथे एका मोकळ्या जागेत त्यांना एक झाड दिसलं ते झाड एक दिव्य झाड होत.
लीसा आणि तिचे त्या झाडाजवळ पोहोचले. तोच त्यांना झाडाखाली एक छोटासा दरवाजा दिसला. पहिले त्यांना त्या झाडाची जराशी भीती वाटली. पण ते सर्व कुतूहलाने झाडाच्या त्या घरात शिरले.
आणि बघतात तर काय? ते झाड बोलणाऱ्या पशु पक्ष्यांनी भरलेलं होत. ते फक्त एक झाड नव्हतं तर ते त्यांचं घर होत जीथे ते सर्व पशु पक्षी गुण्या गोविंदाने रहात होते.
लीसाला ते सगळ बघून खूप नवल वाटल ती त्यांच्या जवळ गेली आणि त्यांच्या बद्दल जाणून घेऊ लागली.
"तुम्ही सगळे अस या झाडात काय करत आहात? आणि तुम्हाला आमच्या सारखं बोलता येत?" आश्चर्याने लीसा विचारते.
"हो इथे राहणारे सगळेच जण तुमच्यासारखं बोलू शकतात. पण आमचं बोलण तुला कस कळतं आहे?" एक ससा
"तेच तर मला समजत नाहीये मला तुमचं बोलण कस ऐकू आलं?" लीसा
सगळे आपापसात चर्चा करत असतात. तेवढ्यात एक आवाज येतो.
"थांबा... थांबा... सगळे अशी घाई करू नका. आधी मला सांग पोरी. तु लीसा आहेस न? कारण लीसा नावाच्या मुली मध्येच इथे पाऊल ठेवण्याची क्षमता होती." गजराज
"गजराज तुम्ही काय सांगत आहात ते मला कळत नाहीये. आणि तुम्ही मला कस ओळखता?" लीसा आश्चर्याने विचारते.
"बेटा आम्हाला एका जादूगाराने प्राणी बनवून या झाडात कैद केल आहे. खर तर आम्ही या जंगलाच्या वनदेवींचे रक्षक आहोत. त्या जादूगाराने आम्हाला इथे कैद करून आमच्या वनदेवींना तो त्याच्या महालत घेऊन गेला आहे. कैक वर्षांपूर्वी एक भविष्यवाणी झाली होती. "घाबरू नका सगळ ठिक होईल एक वेळ अशी येईल की इथे एक लीसा नावाची मुलगी या घरात चुकून प्रवेश करेल. आणि पुढे तीच तुम्हाला यातून सोडवेल." तेव्हा पासून आम्ही या क्षणाची वाट पाहात आहोत. बोल करशील न आम्हाला मदत. " गजराज
लीसा ती तलवार घेते. आणि ती व तीचे फ्रेंड्स जंगलाच्या वाटेने चालू लागतात.
काही वेळा नंतर...
खूप चालल्या नंतर. लीसा आणि तीच्या फ्रेंड्सना एक खूप मोठा डोंगर लागतो. आणि ते त्या डोंगरावरून चालू लागतात.
बराच वेळा नंतर...
ते एका सुंदर भल्या मोठ्या महाला समोर येऊन थांबतात. चारी बाजुनी डेरेदार वृक्ष मध्ये एक अरुंद रस्ता आणि समोर उंच महाल ते दृष्य पाहून ते सगळे स्तब्धच होतात. पण लगेच भानावर येत पुढे चालू लागतात.
काही क्षणा नंतर...
अचानक त्यांना समोरून काही सैनिक येताना दिसतात आणि ते लगेच एका झाडामागे लपतात. ते सैनिक पुढे निघून जातात व लीसा आणि तीचे फ्रेंड्स महालात प्रवेश करतात.
लीसा आणि तीचे फ्रेंड्स हळूच लपत छपत चालता चालता महालाचे सौंदर्य बघत असतात. आणि एका खोलीत प्रवेश करतात.
तीथे अनेक मुर्त्या ठेवलेल्या असतात. त्या मुर्त्या बघून तीला गजराजांचं बोलण आठवत आणि ती आपल्या फ्रेंड्सना सांगते.
"हे बघा तुम्ही बाकीच्या खोल्यांमध्ये वनदेवींना शोधा मी या मुर्त्यांमधील योग्य मूर्ती शोधून जादूगाराचा अंत करते पण जरा जपून हं." लीसा
लीसाचे फ्रेंड्स वनदेवींना शोधायला निघून जातात. आणि इकडे लीसा त्या मुर्त्यांमधील जादूगाराची मूर्ती शोधू लागते.
त्या सगळ्या मुर्त्या एक सारख्याच दिसत असतात तरी लीसा त्यातून खरी मूर्ती शोधत असते.
खूप शोधल्यावर एका बंद कपाटामध्ये लीसाला चार छोट्या मुर्त्यांमध्ये ती मूर्ती दिसतेच ती मूर्ती बाकी मुर्त्यांसारखीच असते तरी ती वेगळी वाटत असते लीसाला ते वेगळेपण जाणवत आणि ती त्या मूर्तीला बाहेर काढते.
तोच जादूगाराला समजत आणि तो त्या खोलीत पोहोचतो.
इकडे..
तिच्या फ्रेंड्सना वनदेवी सापडतात ते त्या खोलीत जातात आणि वनदेवींना सोडवतात. व लीसाच्या खोलीकडे परत येतात.
तो जादूगार लीसाला बघताच ती मूर्ती हस्तगत करायला धावून येतो तेवढ्यात त्या मूर्तीत तलवार खुपसून लीसा जादूगाराचा वध करते आणि त्या रक्षकांना व वनदेवींना जादूगाराच्या तावडीतून सोडवते.
आपण एक बालकथा बघितली आता कथा लिहिली जाते ते पाहूत :
आणि या आहेत कथा लेखनासाठी काही टिप्स :
१. तुमच्या कल्पनेपासून सुरवात करा:
तुमची कथा कशा बद्दल आहे? तुमच्या कथेची कल्पना काय आहे याचा विचार करा.
उदा. 'एक जादूई झाड' या कथेची कल्पना आहे. की, "एक मुलगी जी आपल्या फ्रेंड्स बरोबर जंगलात फिरायला जाते. जीथे तीला आणि तिच्या फ्रेंड्सना एक झाड दिसत त्या झाडात काही बोलणारे प्राणी रहात असतात. ती त्या प्राण्यांना आणि वनदेवींना जादूगाराच्या तावडीतून सोडवते."
२. तुमची पात्रे विकसित करा:
तुमच्या कथेत कोणती पात्रे आहेत. किती पात्रे आहेत त्याचा विचार करा त्या पात्रांबद्दल अगदी तपशीलवार लिहा जस त्यांचा स्वभाव वागण इ.
उदा. 'एक जादुई झाड' मधील लीसा. लीसाचा स्वभाव जिज्ञासू वृत्तीचा असतो. ती लहान जरी असली तरी ती धाडसी होती आणि सगळ्यांना मदत करणारी होती.
३. प्लॉट्स पॉईंट्स तयार करा :
तुमच्या कथेत घडणाऱ्या प्रमुख घटनानंबद्दल सुरवाती पासून शेवट पर्यंत कुठल्या घटना असतील ते ठरवा यामध्ये मोठ्या आणि किरकोळ घटनांचा समावेश असू द्या.
उदा. 'एक जादूई झाड' मध्ये वनदेवींच्या रक्षकांना जादूगर एका झाडात कैद करतो. ही एक या कथेतील घटना झाली.
४. प्लॉट्स पॉईंट्स व्यवस्थित करा :
तुमच्या प्लॉट पॉईंट्सना अशा क्रमाने ऑर्गनाइज करा. ज्या मध्ये घटना क्रमा क्रमाने समोर येत आहेत.
उदा. 'एक जादुई झाड' ही एक हलकी फुलकी बालकथा होती. त्यामुळे त्यातील घटना ही तश्याच आहेत. जस
घटना १) सगळे फ्रेंड्स जंगलात फिरायला जातात.
घटना २) तीथे त्यांना बोलणारे प्राणी भेटतात.
घटना ३) ती व तीचे फ्रेंड्स मिळून प्राण्यांना आणि वनदेवींना जादूगाराच्या तावडीतून सोडवतात.
या आहेत या कथेतील घटना.
५. प्रत्येक भागासाठी सारांश लिहा :
प्रत्येक भागामध्ये काय घडणार आहे याचा थोडक्यात सारांश लिहा आणि मग तो भाग सविस्तर लिहा.
६. तपशील भरा :
एकदा तुमच्याकडे कथेची आउटलाईन तयार झाली की मग कथेचे भाग लिहायला सुरवात करा.
७. संपादित आणि परिष्कृत करा :
तुम्ही तयार केलेली कथेची आउटलाईन पुन्हा एकदा वाचा आणि आवश्यक तेथे बदल करा तुमच्या कथेच्या रचनेत समाधानी होईपर्यंत परिष्कृत करा.
Conclusion :
आजच्या पोस्ट मध्ये आपण 'कथा लेखन कसे करावे' हे बघितल. या मध्ये आपण एक कथा घेतली आणि या कथेच उदाहरण घेऊन नेमक कथेची कल्पना कशी मांडतात त्याची आउटलाईन कशी तयार केली जाते पात्रांचा विचार कसा केला जातो हे शिकलो. मला आशा आहे ही पोस्ट तुम्हाला नक्की आवडली असेल.