आयुष्याला साथ द्यायला निघालो आहे
मी आशेचा नवा किरण बनायला निघालो आहे
उंच भरारी घेऊन मी माझी स्वप्ने पूर्ण
करायला निघालो आहे
आज मी आयुष्याला साथ द्यायला निघालो आहे
माहित आहे जीवन खूप कठीण आहे
तरीही मला चालत राहायचं आहे
मी यशाच्या शिखरावर पोहोचायला जात आहे
मी आयुष्याला साथ द्यायला निघालो आहे
तु लढ तु जिंक हे स्वतः ला सांगायला निघालो आहे.
आपल्या स्वप्नांना पूर्ण करायला निघालो आहे
आयुष्याला एक नवी दिशा द्यायला निघालो आहे
मी स्वतःला सिद्ध करायला निघालो आहे