विहानच्या रूममध्ये...
विहान आणि सिया आपल्या रूममध्ये येतात. दोघही दूरच्या प्रवासामुळे चांगलेच थकलेले असतात. तसच विहान बॅग मधले कपडे घेऊन आवरायला निघून जातो. तर सिया आपल सामान लावू लागते.
काही वेळा नंतर...
सिया आपल्याच धुंदीत असते. ती कपाट लावत असते. तोच तिला एक आवाज ऐकू येतो.
"हेल्प मी प्लिज"
आणि सिया मागे वळून बघते. पण तिथे कुणीच नसत. ती परत कपाट आवरू लागते
काही क्षणानंतर...
विहान आपल आवरून बाहेर येतो. तोच शंभु ही रूममध्ये चहा घेऊन येतो.
(दार वाजवून ) : "साहेब चहा." शंभु
"ठेव टेबलावर " आवरता आवरता विहान म्हणतो.
शंभु सिया कडे परत एकदा वेगळ्याच नजरेने बघतो व चहाचा ट्रे टेबलावर ठेऊन निघून जाते.
शंभुच्या मनात राहून राहून एकच विचार येत असतो. "हे कस शक्य आहे? आपण ज्या गुन्ह्याचे नकळत साक्षी आहोत तोच चेहरा असा एकदम कसा समोर येऊ शकतो."
शंभु आपल्याच विचारात मग्न असतो आणि त्याच वेळी त्याला तो भूतकाळ आठवतो.
भूतकाळात...
एका प्रशस्त हॉलमध्ये एक व्यक्ती आणि एक स्त्री जमिनीवर जखमी होऊन पडलेल्या स्त्रीकडे घाबरलेल्या स्थितीत स्तब्ध होऊन एकटक बघत असतात. तेवढ्यात तिथे शंभु येतो.
"मालक तुम्ही हे काय केलत? तुम्ही मालकीण बाईंचा खून केलात." शंभु
"शंभु तु? हे.. हे.. बघ शंभु मी मुद्दाम नाही केलय. माझा तिला मारण्याचा उद्देश नव्हता. हे बघ यातून आता तूच मला वाचवू शकतोस मला मदत कर यातून सोडव मी तुला जे हवं ते देईन." व्यक्ती
"माफ करा मालक पण मी तुमच्या गुन्ह्यात भागीदार नाही होणार. मी जर तुम्हाला मदत केली तर मला माझ मन सारखं खात राहील आणि मी मालकीण बाईंना आपला चेहरा दाखवू शकणार नाही." शंभु
"म्हणजे, तु माझ खाल्लेल मीठ विसरशील. माझ्याशी गद्दारी करशील. तुला त्या मेलेल्या बाईची काळजी आहे पण माझी नाही हे बघ मी तुझा मालक आहे हे तु कधीच विसरू नकोस." व्यक्ती
"अस नका म्हणू मालक. बर मी काय मदत करू तुमची. मी तुमचं मीठ खाल्लय मी तुमच्याशी गद्दारी करण्याचा विचार देखील करू शकत नाही. आम्ही छोटी माणसं आम्ही काय तुमच्याशी गद्दारी करणार." शंभु
"हमम... विचार ही करायचा नाही. बर आता हे शव मागच्या अंगणात पुरण्यात मला मदत कर पुढच पुढे बघु." व्यक्ती
दोघ मागच्या अंगणात शव पुरतात आणि तोच शंभु आठवणीतून जागा होतो. त्याला नकळतपणे आपल्या हातून घडलेल्या गुन्ह्याची जाणीव होते. तोच त्याला एक आवाज ऐकू येतो.
"शंभु..."
तो आवाजाच्या दिशेने बघतो तर काय त्याला तिथे एक व्यक्ती उभी असलेली दिसते. त्या व्यक्तीला बघताच त्याची भीतीने गाळणच उडते. त्याला दरदरून घाम फुटतो आणि त्याच्या समोर एक क्षण त्याचा पूर्ण भूतकाळ येऊन जातो. त्या व्यक्तीला बघताच तो जोरात किंचाळतो आणि बेशुद्ध पडतो.
इकडे...
विहान व सिया आपल्या रूममध्ये रेस्ट करत असतात. तोच शंभुचा आवाज ऐकून दोघ ही बाहेर येतात. बघतात तर काय शंभु बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेला असतो. शंभुला बेशुद्ध अवस्थेत बघून विहान त्याला उचलून सोफ्यावर झोपवतो. आणि सिया तोंडावर पाणी शिंपडून शंभुला शुद्धीत आणते.
काही वेळा नंतर...
शंभु शुद्धीत येतो. सिया त्याला बेशुद्धीच कारण विचारणारच असते. तेवढ्यात तो तिला बघून भीतीच्या अवस्थेतच पुटपुटू लागतो.
"नाही.. नाही... मला सोडा मी काही केल नाही. मला सोडा मी निर्दोष आहे." भीतीने शंभु पुटपुटतो.
त्याच बोलण ऐकून दोघ ही चक्राऊनच जातात. आणि त्याला हलवून भानावर आणतात. सिया मात्र तिथून निघून जाते व विहान शंभूची विचार पूस करू लागतो.
"दादा, तुम्हाला आता बर वाटत आहे का? कसे आहात तुम्ही? आणि अचानक काय झाल होत?" काळजीने विहान विचारतो.
"मी ठीक आहे मालक. उगीच माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला." जागेवरून उठत शंभु म्हणाला.
त्याने एकदा सगळीकडे आपली नजर फिरवून बघितल. आणि परत उशिवर डोक टेकवलं. एव्हाना विहानला समजून चुकलं होत. "नक्कीच शंभुचा काही तरी प्रॉब्लेम आहे. आणि याच कारण म्हणजेच सिया." तो आपल्याच विचारात तिथून निघून गेला.
क्रमशा...