चित्रपट श्रुष्टीतलं पुढच म्हणजेच आधुनिक पाऊल ओटीटी प्लॅटफॉर्म होय. चला तर मग जाऊन घेऊत या बद्दल थोडेसे.
डिजिटल माध्यमंमुळे आज जग खूपच जवळ आलं आहे. इंटरनेटच्या दुनियेतून आपण प्रत्येक गोष्ट हवी तेव्हा मिळवू शकतो पाहू शकतो. अगदी चित्रपटांबद्दलच बोलायचं झाल तर डिजिटल माध्यमांमुळेच आज मालिका असो किंवा एखादा चित्रपट असो आपण कुठेही बसून सहज पाहू शकतो.
ही आहेत काही महत्वाची ओटीटी प्लॅटफॉर्म ची नावे.
१) नेटफ्लिक्स :
नेटफ्लिक्स ची स्थापना २९ ऑगस्ट १९९७ रोजी झाली. ही कंपनी स्कॉट्स व्हॅली येथे रीड हेस्टिंग आणि मार्क रँडॉल्फ यांनी स्थापन केली.
नेटफ्लिक्स आपल्या सदस्यांना स्ट्रीमिंगची सेवा पुरवते. तसेच नेटफ्लिक्स मधून आपण विविध प्रकारचे चित्रपट, टीव्ही शोज, माहितीपट अगदी सहजतेने पाहू शकतो. नेटफ्लिक्स मधून आपण एका खात्यातून एका पेक्षा जास्त प्रोफाइल बनवू शकतो. तसेच नेटफ्लिक्सच्या इतर चित्रपट टीव्ही शोज मध्ये कंपनीचे स्वतः चे चित्रपट, टीव्ही शोज, आणि माहितीपट देखील आहेत.
२) अल्ट बालाजी :
'अल्ट बालाजी' हे एक भारतीय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असून याची स्थापना एकता कपूर यांनी १६ एप्रिल २०१७ रोजी मुंबई येथे केली.
हे प्लॅटफॉर्म भारतीय सबस्क्रीप्शन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे.
अल्ट बालाजीचे आपल्याला स्वतः चे ड्रामा, रोमान्स, क्राइम, थ्रीलर, तसेच कॉमेडी अशा विविध शैलीमध्ये शोज बघायला मिळतात.
अल्ट बालाजीला भारतीय टेलिव्हीजन अकॅडमी पुरस्कार आणि इंडियन टेली अवॉर्ड्स मधील नामांकन पुरस्कार मिळालेली आहेत.
३) डिस्ने + हॉटस्टार :
'डिस्ने + हॉटस्टार' हे एक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असून हे वॉल्ट डिस्ने कंपनीचे प्रॉडक्ट आहे. याची भारतात ३ एप्रिल २०२० रोजी सुरवात करण्यात आली.
हॉटस्टार मुळता २०१५ मध्ये भारतीय टीव्ही शोज, चित्रपट आणि लाईव्ह स्पोर्ट्स साठी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म म्हणून लॉंच करण्यात आले होते. हे प्लॅटफॉर्म भारतात झपाट्याने लोकप्रिय झाले.
डिस्ने + हॉटस्टार हे जुलै २०२१ पर्यंत ३४ दशलक्ष युजर्ससह भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म पैकी एक बनले आहे.
४) वुट :
'वुट' वुट हे व्हायाकॉम18 च्या मालकीचे एक भारतीय सबस्क्रीप्शन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे.
हे प्लॅटफॉर्म मार्च २०१६ मध्ये विनामूल्य जाहिरातींसह व्हिडीओ - ऑन - डिमांड प्लॅटफॉर्म म्हणून लॉंच केले गेले.
सुरवातीला यातून फक्त व्हायाकॉम18 चे टीव्ही चॅनेल्स नेटवर्क मधून कन्टेन्ट दिले जात होते. कालांतराने वुटने इतर नेटवर्क आणि प्रोडक्शन हाऊस मधील शो व चित्रपट इंकलुड करायला सुरवात केली.
मे २०१९ मध्ये वुट ने वुट सिलेक्ट नावाची प्रीमियम सबस्क्रीप्शन सेवा सुरु केली. या सबस्क्रीप्शन मध्ये वेबसिरीज इंटरनॅशनल शो तसेच लाईव्ह टीव्ही चॅनेल्स ऍड फ्री बघता येतात.
आज वुट हे भारतातील लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म बनले आहे.