ही एक काल्पनिक कथा असून हिचा कुठल्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही तरी संबंध आलाच तर तो एक निव्वळ योगायोग समजावा.
भयानक रात्र आहे. मुसळधार पाऊस पडत असतो. विजाही चमकत असतात. आणि अशातच एका घरातून जोरात किंचाळी ऐकू येते.
पंधरा दिवसा नंतर...
गोखले निवास...
वेळ सकाळी १0 वाजताची...
आज गोखलेनंच घर पाहुण्यांनी नुसत गजबजलेल होत. याच कारण म्हणजे विहान. विहानच नुकतच त्याची बाल मैत्रीण सियाशी लग्न झाल होत. आणि आता दोघ पुण्याच्या नवीन घरात शिफ्ट होणार होते. विहान एक खूप हुशार मुलगा होता आणि समंजस देखील होता. विहान घरातला सगळ्यात लहान मुलगा होता. त्याच्या कुटुंबात त्याचे वडील गिरीश आई सौदामिनी मोठा भाऊ अनंत आणि वहिनी शुभदा इतकी लोक होती. तर सियाच्या कुटुंबात सियाचे वडील विलास आई ज्योती आणि लहान बहीण गार्गी इतके लोक होती. गिरीश आणि विलास दोघ एकमेकांचे चांगले मित्र होते. आणि एकाच ऑफिसमध्ये काम ही करत होते. हाच विचार करून त्यांनी दोघांच लग्न लावून दिल होत. आणि आता दोघ नवीन घरात राहायला जाणार होते. विहान सॉफ्टवेअर इंजिनियर होता. म्हणून त्याचा चांगला परफॉर्मन्स बघून त्याला पुण्याच्या कंपनीत सिनिअर इंजिनियर ची पोस्ट दिली गेली होती. आणि नवीन घर ही दिल गेल होत. त्यामुळे आज विहानला प्रत्येकजण भेटायला येत होते.
विहान आपली निघण्याची तयारीच करत असतो तेवढ्यात दार वाजत.
विहान (दार उघडत) :- "अरे, आई... बाबा... तुम्ही? या न... या (सियाला आवाज देत ). सिया आई बाबा आले आहेत. या बसा."
"आई बाबा तुम्ही कधी आलात? नमस्कार करते."
"हे काय बेटा, आम्ही आत्ताच आलो आहोत. झाली तुमची निघण्याची सगळी तयारी? घेतल न सगळ बरोबर?"
सिया (हसून ) :- "हो, बाबा सगळी तयारी झालीये. बर तुम्ही सगळे बसा मी चहा करून आणते."
सिया चहा करायला निघून जाते इकडे सगळे गप्पा मारू लागतात.
काही वेळा नंतर...
सिया सगळ्यांना चहा घेऊन येते व सगळे एकत्र गप्पा मारत चहा घेऊ लागतात.
एक दीड तासा नंतर...
ती दोघ आपल आवरून सर्वांचा निरोप घेऊन पुण्यासाठी रवाना होतात. इकडे विहानच्या बॉसनी घर आवरण्यासाठी एका नोकराला पाठवलेलं असत. तो विहान येई पर्यंत घराची सगळी साफसफाई करून ठेवतो.
चार तासा नंतर...
एक सुंदर आलिशान घरासमोर विहानची कार येऊन थांबते. आजूबाजूला सुंदर वनराई उजव्या बाजूला छोटस लॉन आणि दोघच बसू शकतील इतकी छोटी बंगयी (झोका ). प्रथम दर्शनी पाहता ते घर अगदी महाला सारखं वाटत होत. पण म्हणतात न. "प्रत्येक चांगली वास्तू ही चांगली असतेच अस नाही. त्याच्या मागे काही ना काही इतिहास एखाद रहस्य हे असतच."
असच काहीस या घराच्या बाबतीत सुद्धा होत. त्या वास्तुच एक रहस्य होत जे लवकरच सिया समोर येणार होत.
विहानची कार मेन गेट जवळ येऊन थांबली. तोच सेक्युरिटी गार्ड भोला नवीन मालकाला आलेलं पाहून दार उघडतो. आणि त्यांची कार घरासमोर येऊन थांबते.
शंभु (नोकर ). त्यांची वाट बघतच असतो त्यांना आलेलं बघून तो लगेच स्वागताला समोर येऊन उभा राहातो. तोच सियाला पाहून त्याला आश्चर्याचा धक्काचं बसतो आणि तो मनात पुटपुटतो.
"छोट्या मालकीण बाई"
विहान त्याला भानावर आणतो. आणि तिघ घरात प्रवेश करतात. दोघांना त्याच वागण जरा खटकत पण ते त्याकडे दुर्लक्ष करतात. आणि आपल नवीन घर पाहू लागतात.
इकडे... शंभु त्यांचं सामान खोलीत नेऊन ठेवतो. तर विहान सियाला नवीन घर दाखवू लागतो. सिया आपल हक्काचं नवीन घर बघता बघता नवीन संसाराची स्वप्ने रंगवत असते.
तिच्या समोर त्यांचं पूर्ण बालपण दोघांनी एकत्र घालवलेले क्षण एकमेकांवरच प्रेम सगळा प्रवास येऊन उभा रहातो. ते दोघ आपल घर बघतच असतात की, तिथे शंभु येतो आणि म्हणतो.
"मालक, तुमचं सामान खोलीत ठेवलय तुम्ही फ्रेश व्हा मी चहा ठेवतो."
विहानशी बोलून शंभु चहा बनवायला निघून जातो आणि विहान व सिया आपल्या खोलीत निघून येतात.
क्रमशा...