स्वतःला सिद्ध करत
एक नवीन वाट
बनवायची आहे
किती ही अडथळे
आले जीवनात
तरी ही स्वतःला
सिद्ध करायचे आहे
नाउमेद तू कधीही होऊ
नकोस हे स्वतःला सांगायचे आहे
तू हे जग जिंकू शकतेस
हे स्वप्न तुला पूर्ण करायचे आहे
तुला तुझी एक नवी ओळख
बनवायची आहे हा ध्यास
मनी ठेवायचा आहे
एक नवीन वाट बनवायची आहे