आज 2 तारीख म्हणजे नवीन वर्षातील जानेवरीतला दुसरा दिवस. आता प्रत्येकजण काही न काही संकल्प करणार आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न देखील करणार कुणाला आपल्या सवयी बदलायच्या असतील तर कुणी सकाळी उठून फिरायला जाण्याचा संकल्प केला असेल.
पण या सगळ्यामध्ये आपल्याला कुणी तरी मदत करणार म्हणजेच आपल्याला मोटिवेट करेल अस नाही का वाटत तुम्हाला.
आणि त्यातून ही जर का आपला मोबाईलच जर आपला सपोर्ट सिस्टीम बनला तर? आपण नेहमी मोबाईलचे दुष्परिणाम ऐकत वाचत असतो पण जर का मनात चांगले विचार ठेवून मोबाईलचा योग्य वापर केला तर नक्कीच मोबाईल एक चांगला सपोर्ट सिस्टीम बनू शकतो.
आज या लेखात अश्याच पाच ऍप्स बद्दल आपण जाणून घेणार आहोत जे निश्चितच आपलं जीवन बदलण्यास मदत करतील.
चला तर मग जाणून घेऊत ते पाच ऍप्स कोणते:
१) 21 days:
'21 days’ हे ऍप अगदी युजर फ्रेंडली ऍप आहे. यामध्ये जी सवय बदलायची आहे त्या सवयीचं नाव टाका आणि त्याला नीट सेट करा. म्हणजे टायटल देऊन रिमाईंडर सेट करा. उदाहरण. ‘सकाळी फिरायला जाणे’ ५:३०एम ला. बस एवढच पुढे तुमचं ऍप च तुम्हाला जाग करेल. हे ऍप नोव्हेंबर4, 2016 ला डेव्हलप झालेलं असून याचे डेव्हलपर स्टॅम्पनगो ही कंपनी आहे. तसेच याचे १०,०००+ डाऊनलोड्स आहेत.
२) पावन (paavan) :
हे ऍप एक आध्यात्मिक ऍप आहे. हे ऍप ऑक्टोबर 4, 2021 मध्ये डेवलप झाल. या मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या संतांच्या ध्यानाच्या पद्धतींचा अनुभव घेता येईल. तसेच १८ पुराणांबद्दल जाणून घेता येईल पौराणिक कथांचा आस्वाद घेता येईल तसेच सुविचार योगा यांबद्दल ही जाणून घेता येईल. या ऍप चे ५००,०००+ इतके डाउनलोड्स आहेत.
३) Rgyan (आरग्यान):
आध्यात्मिक मार्गातलच हे आणखी एक ऍप. हे ऍप एक आध्यात्मिक सोशल मीडिया ऍप आहे हे ऍप हिंदी आणि इंग्लिश भाषेत उपलब्ध आहे. या ऍपमध्ये आरोग्य धार्मिक संस्कृती सणवार ज्योतिष याविषयी माहिती मिळेल याचे ५०,०००+ डाउनलोड्स आहेत.
४) हेल्थफायमी (healthifyme):
प्लेस्टोर वरच हे ऍप
प्लेस्टोर वरच हे ऍप तस सर्वांनाच माहीत असलेलं ऍप आहे. या ऍप मध्ये पर्सनल ट्रेनर्स आहेत जे तुम्हाला योगा योग्य डाएट प्लॅन प्रोवाईड करतात. तसेच हे ऍप वेटलॉस व कॅलरी काऊंट साठी ही काम करत हे ऍप मे ११, २०१३ मध्ये डेव्हलप करण्यात आलं आणि याचे १०,०००,०००+ डाउनलोड्स आहेत.
५) स्टेप्स ऍप(StepsApp – Step Counter):
आपल्याला कायम प्रत्येक गोष्टीसाठी मोटिवेशन ची गरज असते. तेच मोतीवेशनच काम स्टेप्सऍप करत. हे ऍप एकदम युजर फ्रेंडली ऍप असून ऑफलाइन आहे. या ऍपला ऑन केलं की तुम्ही किती स्टेप चाललात तसेच किती किलोमीटर चाललात आणि किती कॅलरीज बर्न केली हे सांगत. हे ऍप ऑगस्ट २८, २०२७ ला डेव्हलप झालेलं असून याचे ५,०००,०००+ डाउनलोड्स आहेत.